IPL 2023 CSK vs MI : रोहित शर्मा पुन्हा झिरोवर OUT..! धोनीनं केला ‘गेम’; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 CSK vs MI : चेपॉक मैदानावर आयपीएल 2023 चा 49वा एल क्लासिको सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकडून यावेळी कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन यांनी सलामी दिली. पण हा प्लॅन अपयशी ठरला. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आला. पण धोनीच्या माइंडगेममुळे त्याला पुन्हा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने रोहितला तंबूत पाठवले. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित माघारी परतला. या षटकाचा चौथा चेंडू रोहितने निर्धाव खेळला. तेव्हा धोनी लाँग विकेटकिपींग करत होता. मात्र पाचव्या चेंडूसाठी धोनीने क्लोज विकेटकिपींग करण्याचा निर्णय घेतला. रोहितने ही संधी पाहून लॅप शॉट खेळण्याचा निर्णय घेतला. पण दीपकचा स्विंग झालेला चेंडू रोहितच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि त्याचा झेल गल्लीच्या दिशेने गेला. तिथे तैनात असलेल्या रवींद्र जडेजाने हा झेल टिपला. रोहितने एकूण 3 चेंडू खेळले.

हेही वाचा – धक्कादायक..! KKR कॅप्टन नितीश राणाच्या पत्नीसोबत गैरवर्तन; पाहा Video

आयपीएलच्या इतिहासामध्ये रोहित आता सर्वाधिक वेळा शून्यावर होणारा फलंदाज ठरला. याआधीच्या सामन्यातही रोहित पंजाहबविरुद्ध शून्यावर माघारी परतला होता. या आयपीएलमध्ये रोहित खूपच खराब फलंदाजी करत आहे. त्याच्या फॉर्मवर सातत्याने टीका होत आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज

  • 16 – रोहित शर्मा
  • 15 – सुनील नरिन
  • 15 – मनदीप सिंग
  • 15 – दिनेश कार्तिक

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment