IPL 2023 : चेन्नईला हरवणं सोपं नसतं..! मुंबई इंडियन्सचा ‘मोठा’ पराभव; रोहित पुन्हा फेल!

WhatsApp Group

IPL 2023 Chennai Super Kings Beat Mumbai Indians : आयपीएल 2023 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा (CSK vs MI) 6 विकेट्सने पराभव केला आहे. चेन्नईच्या बालेकिल्ल्यात त्यांना हरवणे सोपे नसते, हे पुन्हा एकदा समोर आले. प्रथम फलंदाजी करताना नेहल वढेराच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 8 गडी गमावून 139 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने 14 चेंडू राखून सामना जिंकला. चेन्नईने 17.4 षटकांत चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 44 धावा केल्या. मुंबईकडून पीयुष चावलाने दोन बळी घेतले.

चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर नेहल (51 चेंडू, 64 धावा) व्यतिरिक्त मुंबईचा एकही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीला आला. रोहितने कॅमेरून ग्रीनला सलामीला पाठवले, पण त्याची बॅट चालली नाही. इशान किशनही लवकर बाद झाला. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आला, पण त्याला खातेही उघडता आले नाही. सूर्यकुमार यादवने 26 धावा केल्या. तिलक वर्माच्या जागी आलेल्या ट्रिस्टन स्टब्सने 20 धावांची खेळी केली. नेहल वढेराने सूर्यकुमार यादव आणि ट्रस्टिन स्टब्ससोबत दोन अर्धशतकी भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मात्र, ही धावसंख्या चेन्नईला पराभूत करण्यासाठी पुरेशी ठरली नाही.

हेही वाचा – Air India : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशाला विंचू चावला! नक्की काय घडलं?

चेन्नईकडून कॉनवेने 42 चेंडूंत चार चौकारांसह 44 धावांची जबाबदारीपूर्ण खेळी करत यजमानांना विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड 16 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने एक गडी गमावून 55 धावा केल्या. चेन्नईकडून मथिश पाथिरानाने 4 षटकांत 15 धावांत तीन बळी घेतले, तर दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

चेन्नई 11 सामन्यांत 6 विजय आणि 4 पराभवांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर मुंबई 10 सामन्यांतून 5 विजय आणि 5 पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment