IPL 2023 : सलग सिक्सर ठोकत धोनीचा ‘बडा’ रेकॉर्ड..! लोकांना दिसला ‘विंटेज’ माही; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने लखनऊ सुपर जायंट्सचा (CSK vs LSG) 12 धावांनी पराभव केला. सीएसकेच्या विजयाचा हिरो ठरला मोईन अली, त्याने चार विकेट घेतल्या. पण या सामन्यात धोनीने जे दोन षटकार ठोकले, त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

धोनीचा पराक्रम!

धोनीने या सामन्यात एक नवा विक्रम केला. धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय आणि एकूण सातवा फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी धोनी त्याच्या पाच हजार धावांपासून आठ धावा दूर होता. चेन्नईच्या डावातील शेवटच्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर षटकार ठोकत धोनीने ही कामगिरी केली. धोनीने मार्क वूडच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. त्याने तीन चेंडूत 12 धावांची खेळी केली. चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमावून 217 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात 205 धावाच करू शकला.

चेन्नईची धमाल फलंदाजी!

चेन्नईची सुरुवात खूपच वादळी झाली. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या सहा षटकात 79 धावा केल्या. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 92 धावा करणाऱ्या गायकवाडने ती लय कायम ठेवली, तर किवी खेळाडू कॉनवेने त्याला पूर्ण साथ दिली. वेगवान गोलंदाज आवेश खानने दुसऱ्या षटकातील पहिल्या चार चेंडूत 16 धावा दिल्या. त्यानंतर गायकवाडने पाचव्या षटकात कृष्णप्पा गौतमला तीन षटकार ठोकले. चेन्नईच्या 100 धावा आठव्या षटकातच झाल्या.

हेही वाचा –  आंबे खाण्यापूर्वी ते पाण्यात ठेवायचे असतात का? जाणून घ्या सत्य!

डावाच्या दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रवी बिश्नोईने ऋतुराज गायकवाडला मार्क वूडकरवी झेलबाद करून लखनऊला पहिले यश मिळवून दिले. ऋतुराज गायकवाडने 31 चेंडूत 3 चौकार आणि चार षटकारांसह 57 धावा केल्या. ऋतुराज आणि कॉनवे यांनी 110 धावांची भागीदारी केली. मार्क वूडने पुढच्याच षटकात डेव्हॉन कॉनवेला आपला बळी बनवले. कॉनवेने 29 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांसह 47 धावा केल्या.

यानंतर शिवम दुबेच्या झंझावाती खेळीमुळे चेन्नईने 14व्या षटकातच 150 धावांचा आकडा गाठला. दुबेने तीन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. रवी बिश्नोईने दुबेला मार्क वूडकरवी झेलबाद केले. दुबेनंतर सीएसकेनेही मोईन अली (19) आणि बेन स्टोक्स (8) यांच्या विकेट्स गमावल्या.

अंबाती रायडूने (नाबाद 27) काही मोठे फटके मारत सीएसकेला 200 च्या पुढे नेले. रवींद्र जडेजा तीन धावा करून मार्क वूडचा बळी ठरला. त्यानंतर कर्णधार धोनी फलंदाजीला आला आणि त्याने सलग दोन षटकार ठोकत चेपॉकमध्ये प्रेक्षकांना रोमांचित केले. मार्क वूडला तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. लखनऊकडून मार्क वूड आणि रवी बिश्नोईने ३-३ बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment