IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 : आयपीएल (IPL) 2023 चा क्वालिफायर 1 सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉच कॉनवे यांनी चांगली सुरुवात केली. गुजरातला पहिले यश पॉवरप्लेमध्येच मिळाले असते, पण ते अनलकी ठरले. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाला असता, पण घडले वेगळेच.
वैयक्तिक 2 धावांवर असताना ऋतुराज गायकवाड तंबूत परतला असता. गुजरातने आज दर्शन नळकांडे या वेगवान गोलंदाजाला संधी दिली. त्याने आपल्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराजला शुबमन गिलकरवी झेलबाद केले, पण पंचानी हा बॉल नो ठरवला. दर्शनने क्रीजच्या पुढे जाऊन चेंडू टाकला होता.
Gaikwad: From🙁 to 🤩
A twist of fate sees Ruturaj maximize with the bat in #GTvCSK ⚔️#IPLPlayOffs #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @ChennaiIPL pic.twitter.com/dOfabAaXTS
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
Darshan Nalkande dismissed Ruturaj Gaikwad, but it's a No Ball.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2023
हेही वाचा – Electric Car : गाडी घ्यायचीय? फक्त 1 वर्ष थांबा, महिंद्रा आणतेय ‘ही’ इलेक्ट्रिक कार!
या जीवदानाचा फायदा उचलत ऋतुराजने याच षटकात दर्शनला एक षटकार आणि एक चौकार ठोकला. शिवाय अर्धशतकही झळकावले. ऋतुराजने आज 44 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि एका षटकारासह 60 धावा केल्या. मोहित शर्माने 11व्या षटकात त्याला बाद केले.
GT विरुद्ध ऋतुराज गायकवाड
- 73(48), पुणे, 2022
- 53(49), मुंबई, 2022
- 92(50), अहमदाबाद, 2023
- 60(44), चेन्नई, आज
साखळी फेरीत गुजरात टायटन्सने पहिले तर चेन्नई सुपर किंग्जने दुसरे स्थान पटकावले. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट अंतिम सामना खेळेल. पराभूत संघ अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 26 मे 2023 रोजी होणाऱ्या क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्याशी खेळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!