IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्ज ने IPL 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. धोनी ब्रिगेडने मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. चेन्नईने 173 धावांचे लक्ष्य ठेवले, त्याला प्रत्युत्तरात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ निर्धारित 20 षटकात 157 धावांवर आटोपला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईकडून गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता.
फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर मॅच प्रेझेंटेशनमध्ये हर्षा भोगले यांनी प्रश्न विचारला. तो असा…
हर्षा भोगले : तू पुन्हा चेपॉकला येऊन खेळणार आहेस का?
धोनी : ऑक्शनसाठी 8-9 महिने बाकी आहेत, मी प्रत्येक वेळी CSK साठी तिथे असेन, निर्णय घेण्यासाठी बराच वेळ आहे.
Harsha Bhogle said "Will you come & play here in Chepauk again".
MS Dhoni said "There is 8-9 months left for auction, I will be there for CSK everytime, lots of time to decide". pic.twitter.com/mg58kcZm6D
— Johns. (@CricCrazyJohns) May 23, 2023
हेही वाचा – IPL 2023 CSK Vs GT Qualifier 1 : चेन्नईनं टाकलं जाळं..! गुजरातला अडवकत 10व्यांदा गाठली फायनल
" I WILL ALWAYS BE THERE FOR Chennai Super Kings "
– #MSDhoni𓃵 pic.twitter.com/l7MxLhTfdu
— Roвιɴ Roвerт (@PeaceBrwVJ) May 23, 2023
या उत्तरातून असे कळते, की धोनी पुढच्या आयपीएलमध्ये नसणार, ही असल्याचे अफवा आहे. धोनीची गुडघ्याची दुखापत ठीक झाली, तर तो खेळू शकतो, असे मत रैनानेही मांडले.
चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईने 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इतक्या वेळा अंतिम फेरी गाठणारा हा एकमेव संघ आहे. गुजरातला विजेतेपदाचा सामना करण्याची आणखी एक संधी आहे. जीटी क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्याशी लढेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!