IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 : आयपीएल (IPL) 2023 चा क्वालिफायर 1 सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये चेन्नईला प्रेक्षकांचा खूप मोठा आधार मिळाला. या पराभवामुळे गुजरातला आता मुंबई किंवा लखनऊ यांच्यातील विजेत्याशी खेळावे लागेल. त्यानंतर ते फायनलला येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.
गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉच कॉनवे यांनी चांगली सुरुवात केली. गुजरातला पहिले यश पॉवरप्लेमध्येच मिळाले असते, पण ते अनलकी ठरले. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड वैयक्तिक 2 धावांवर तंबूत परतला असता. पण नो बॉलमुळे त्याला जीवदान मिळाले. या जीवदानाचा फायदा उचलत ऋतुराजने 44 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि एका षटकारासह 60 धावा केल्या. मोहित शर्माने 11व्या षटकात त्याला बाद केले. त्यानंतर खेळ थोडा संथ झाला. कॉनवेही 34 चेंडूत 40 धावाच काढू शकला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजा (22) आणि रायुडू (17) यांनी फटकेबाजीमुळे चेन्नईने 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
Saw MS Dhoni (27) play his first IPL final. Still watching him (41) do his thing 👏 pic.twitter.com/ReXJeUBW3T
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 23, 2023
– 14 seasons.
– 10 Finals.
– MS Dhoni led CSK are creating history with their 10th Final of the IPL. pic.twitter.com/fIPLnIZHbP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2023
हेही वाचा – CSK Vs GT Qualifier 1 : नशीब असावं तर ऋतुराज गायकवाडसारखं..! कॅच पकडूनही ठरला Not Out
प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवात खराब झाली. वृद्धिमान साहा (12), हार्दिक पांड्या (8) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. धोनीने अचूक रणनीतीचा वापर करत रवींद्र जडेजा, महिश थिक्षणा यांना गोलंदाजीला आणले. थिक्षणाने हार्दिकला बाद केले. जडेजाने डेव्हिड मिलर आणि दासुन शनाका यांना तंबूत पाठवले. शुबमन गिलने 4 चौकार आणि एका षटकारासह 42 धावा केल्या. पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. गुजरातचा संघ 157 धावांत ऑलआऊट झाला. दीपक चहर, थिक्षणा, जडेजा, पाथिराना यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!