IPL 2023 BCCI To Plant 17000 Trees : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (CSK vs GT Qualifier 1) 15 धावांनी पराभव करत 10व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. सात गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा केल्यानंतर चेन्नईने गुजरात टायटन्सला 20 षटकांत 157 धावांत गुंडाळले.
या सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एकूण 34 डॉट बॉल टाकले. गुजरातसाठी, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 7 च्या इकॉनॉमीसह 28 धावा खर्च केल्या. यादरम्यान तो दोन मोठ्या विकेट्स घेण्यासही यशस्वी ठरला. मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
हेही वाचा – IPL 2023 : धोनी पुन्हा खेळणार! हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर म्हणाला, “अजून 8-9 महिने…”
प्रत्येक डॉट बॉलवर 500 झाडे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने प्लेऑफ सामन्यांबाबत एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी टाकलेल्या सर्व डॉट बॉलचा फायदा पर्यावरणाला मिळणार आहे. बीसीसीआय प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार आहे. गुजरातने 34 डॉट बॉल टाकले आहेत म्हणजे BCCI त्याऐवजी 17000 झाडे लावण्याचे काम करेल.
34 dot ball in CSK innings.
BCCI will plant 17,000 trees – a great initiative by Jay Shah & BCCI – this will continue through the knock-outs. pic.twitter.com/B8KBk2qc9h
— Johns. (@CricCrazyJohns) May 23, 2023
ट्री इमोजी
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान प्रत्येक डॉट बॉलनंतर एक झाड इमोजी दिसत होता. हा इमोजी बीसीसीआयने लावलेल्या झाडांचा संदर्भ देतो. प्लेऑफमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावली जातील. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांनाही लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
The BCCI will be planting 500 trees for each dot ball bowled in IPL 2023 Playoffs. pic.twitter.com/Ac3xVog3UH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!