IPL 2023 CSK vs GT : आयपीएलचा सलामीचा सामना आज गतविजेता गुजरात टायटन्स आणि 4 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरुवात विजयाने करायची आहे. ही केवळ दोन संघांचीच नाही तर दोन कर्णधारांचीही लढत असेल. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या स्वतः सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता आहे. धोनीकडून मला खूप काही शिकायला मिळाल्याचे त्याने स्वतः अनेकदा सांगितले आहे. अशा स्थितीत हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
कुठे पाहता येईल सामना?
गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामना संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. भारतातील जिओ सिनेमा अॅपवर या सामन्याचे लाइव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
हेही वाचा – IPL 2023 : रोहित शर्मा खेळणार नाही? ‘या’ गोष्टीमुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्समध्ये टेन्शन!
कोणाचे पारडे जड?
सीएसकेपेक्षा गुजरात टायटन्स संघ अधिक संतुलित दिसत आहे. गुजरात संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे. त्याच वेळी, सीएसकेकडे बहुतेक अनुभवी खेळाडू आहेत. सीएसकेकडे नंबर-10 पर्यंत अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय आहे. अशा स्थितीत हा सामना चुरशीचा होणार आहे, प्रथमदर्शनी दोन्ही संघ पाहिल्यास गुजरात संघाचे पारडे जड दिसते.
दोन्ही संघांची संभाव्य Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, दीपक चहर, सिमरजीत सिंग.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, राशिद खान, शिवम मावी, आर साई किशोर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!