IPL 2023 CSK vs GT : चेन्नईच्या ‘मराठी’ पोरांची झुंज अपयशी..! गुजरात टायटन्स ५ गड्यांनी विजयी

WhatsApp Group

IPL 2023 CSK vs GT : आयपीएल २०२३ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला ५ गड्यांनी सहज मात दिली. यासह शिष्य हार्दिक पंड्याने गुरू महेंद्रसिंह धोनीला पराभवाची धूळ चारत विजयारंभ केला. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे आणि राजवर्धन हंगरगेकर या मराठी खेळाडूंनी लढावू वृत्ती दाखवली खरी, पण संघाला पहिल्याच सामन्यात पराभव चाखावा लागला.

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी चार चेंडू राखून पूर्ण केले. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला शुबमन गिल, ज्याने 63 धावांची (6 चौकार आणि 3 षटकार) शानदार खेळी केली. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करताना 92 धावांची (4 चौकार आणि 9 षटकार) खेळी केली. चेन्नई-गुजरात यांच्यातील या सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अरिजित सिंग, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया या स्टार्सनी उद्घाटन सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स दिला.

हेही वाचा – Black Salt : रामबाण औषध काळे मीठ..! वजन घटवण्यापासून डायबेटिस कंट्रोल करण्यापर्यंत, वाचा फायदे!

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज : डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, बेन स्टोक्स, अंबती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी (कप्तान/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद. शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment