IPL 2023 : रवींद्र जडेजा पुढच्या वर्षी RCB मध्ये जाणार? वाचा नेमकी भानगड काय!

WhatsApp Group

IPL 2023 Ravindra Jadeja RCB : चेन्नई सुपर किंग्जने IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने धोकादायक गोलंदाजी करताना 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 18 धावा दिल्या. जडेजाच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला ‘मोस्ट व्हॅल्युएबल अॅसेट ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. याबाबत त्याने एक मजेशीर ट्वीट केले आहे, ज्यावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

गुजरातवर विजय मिळवत चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सीएसकेच्या विजयानंतर जडेजाने पुरस्कारासोबतचा एक फोटो शेअर केला. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने चाहत्यांसाठी एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे. जडेजाच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही चाहते जडेजाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत आहेत. जडेजाच्या या ट्वीटनंतर ट्विटरवर ‘कम टू आरसीबी’ हा हॅशटॅग काही काळ ट्रेंड करू लागला.

हेही वाचा – बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना दिले 30 कोटी; त्यांच्या बायका-पोरांनाही….

विशेष म्हणजे, पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 20 षटकांत 172 धावा केल्या होत्या. यादरम्यान ऋतुराज गायकवाडने 60 धावांची खेळी केली. कॉनवेने 40 धावा केल्या. जडेजाने 16 चेंडूत 22 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत सर्वबाद 157 धावाच करू शकला. गुजरातकडून शुभमन गिलने 42 धावांची शानदार खेळी केली. राशिद खानने 30 धावांचे योगदान दिले. यादरम्यान चेन्नईकडून जडेजा, पाथिराना, टेकशाना आणि दीपक चहर यांनी 2-2 बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment