IPL 2023 Auction : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामाची तयारी करत आहे. २०२२ च्या हंगामात मेगा लिलावाने संघांमध्ये बरेच बदल केले असताना, चाहत्यांना एक मिनी लिलाव पाहण्यास मिळेल. माध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआय यावर्षी १६ डिसेंबर रोजी लिलाव आयोजित करण्याची योजना आखत आहे. यासोबतच मेगा लिलावात ९० कोटी रुपये असलेली रक्कमही वाढवून ९५ कोटी रुपये करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका विश्वसनीय सूत्राने पुष्टी केली आहे की मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ च्या हंगामापासून कोविड-१९ पूर्वी त्याच्या मूळ स्वरूपावर परत येईल, ज्यामध्ये संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळत असत. बीसीसीआय ध्यक्ष सौरव गांगुलीने यासंदर्भात बोर्डाशी संलग्न घटकांना माहिती दिली आहे. २०२० मध्ये, कोविड-१९ महामारीच्या उद्रेकामुळे, काही ठिकाणी आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. २०२० मध्ये, दुबई, शारजाह आणि अबुधाबी येथे संयुक्त अरब अमिरातीच्या तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – देशातील ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचं PM मोदींच्या हस्ते लोकार्पण!
IPL 2023 auction to be held at Bengaluru on December 16th. (Source – TOI)
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2022
२०२१ मध्ये, ही स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, परंतु आता महामारी नियंत्रणात आहे आणि त्यामुळे ही लीग घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानाच्या जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.