IPL 2023 Auction : सॅम करन ठरला महागडा खेळाडू..! रहाणेला मिळाला ‘नवा’ संघ; मुंबईचा मास्टरस्ट्रोक!

WhatsApp Group

IPL 2023 Auction : आयपीएल २०२३साठी खेळाडूंचा लिलाव आज कोची येथे सुरू झाला आहे. या मिनी लिलावात सर्व फ्रेंचायझी काही खेळाडू विकत घेऊन आपला संघ सुधारण्याचा प्रयत्न करतील. या लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी २७३ भारतीय खेळाडू आहेत.

कॅमेरून ग्रीन मुंबईकडे

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सॅम करननंतर तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या लिलावात करनला पंजाबने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडूही ठरला आहे. कॅमेरून ग्रीनने यावर्षी भारतीय दौऱ्यावर असलेल्या टी-२० मालिकेत अनेक तुफानी खेळी खेळल्या. तो भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून गणला जात आहे. यासोबतच मुंबईला कायरन पोलार्डची जागाही मिळाली आहे. पोलार्डने यावर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेतली.

हेही वाचा – Video : “लग्न करायचंय, मुलगी मिळत नाहीये…”, सोलापुरातील तरुणांनी काढला मोर्चा; एकदा बघाच

होल्डरला राजस्थानने घेतले विकत 

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला राजस्थान रॉयल्सने ५.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मागील मोसमात होल्डर लखनऊकडून खेळला होता. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडिअन स्मिथला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किमतीत ५० लाख रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी पंजाब किंग्जने झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाला ५० लाखांना खरेदी केले.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

सॅम करणची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. टी-२० विश्वचषकात तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच, अंतिम सामन्यात तो इंग्लंडचा सामनावीर ठरला. करण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले. याआधी केएल राहुल हा सर्वात महागडा खेळाडू होता. लखनऊमध्ये त्याची किंमत १७ कोटी रुपये होती. याशिवाय तो लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यापूर्वी, ख्रिस मॉरिसला २०२१ मध्ये राजस्थानने १६.२५ कोटींना खरेदी केले होते. करन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडूही ठरला. तो याआधीही पंजाब किंग्जकडून खेळला आहे.

हे खेळाडू अनसोल्ड…

बांगलादेशच्या शाकिब अल हसनची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती. शाकिब अल हसन विकला गेला नाही. त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. इंग्लंडचा जो रूट आणि दक्षिण आफ्रिकेचा रायली रुसो हे विकले गेले नाहीत. रुसोने भारतीय दौऱ्यावर टी-२० मध्येही शतक झळकावले. मात्र, दोन्ही कोणीही विकत घेतले नाहीत.

हेही वाचा – महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीवर CM शिंदेंचा खुलासा; म्हणाले, “नागरिकांनी…”

अजिंक्य रहाणे चेन्नईकडे!

भारताच्या अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने ५० लाख रुपयांना विकत घेतले आहे. या वर्षी रहाणे धोनीच्या टीमसोबत खेळताना दिसणार आहे. रहाणेचा अनुभव चेन्नईसाठी उपयुक्त ठरू शकतो.

इतर खेळाडू

केन विल्यमसनला गुजरात टायटन्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. विल्यमसनला विकत घेत गुजरातने आपला संघ आणखी मजबूत केला आहे. सनरायझर्स हैदराबादने यावर्षी विल्यमसनला सोडले. गुजरातचा संघ गतविजेता आहे. हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. मयंक अग्रवालची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment