Wrestlers Protest : 1983 चा विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ आता आंदोलन करणाऱ्या स्टार कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. आता या संघाकडून एक विधान आले आहे, की आंदोलक कुस्तीपटूंशी केलेले गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. कुस्तीपटू आपली पदके गंगेत फेकण्याच्या शक्यतेमुळे चिंतेत असलेल्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाने शुक्रवारी त्यांना घाईघाईत कोणताही निर्णय न घेण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण होईल अशी आशा व्यक्त केली.
28 मे रोजी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना कथित लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी परवानगीशिवाय नवीन संसदेकडे मोर्चा काढताना कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया 30 मे रोजी हरिद्वारला गेल्या, परंतु त्यांना आपली पदके गंगेत विसर्जित करण्यापासून थांबवले गेले.
1983 Cricket World Cup winning team issues statement on wrestlers' protest – "We are distressed and disturbed at the unseemly visuals of our champion wrestlers being manhandled. We are also most concerned that they are thinking of dumping their hard-earned medals into river… pic.twitter.com/9FxeQOKNGj
— ANI (@ANI) June 2, 2023
हेही वाचा – Sachin Tendulkar : आयपीएल संपल्यावर सचिन तेंडुलकरने घेतली 4.18 कोटींची कार!
नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी गदारोळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नव्या संसदेचे उद्घाटन केले. विनेश, साक्षी आणि बजरंगसह सर्व कुस्तीपटूंनी रविवारीच जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत पदयात्रा काढली. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर बराच गदारोळ झाला.
काय म्हणाला 1983 चा विश्वचषक विजेता संघ?
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चॅम्पियन कुस्तीपटूंसोबत झालेल्या गैरवर्तनाची छायाचित्रे पाहून आम्हाला खूप दुःख झाले आहे. ते आपल्या कष्टाने जिंकलेली पदके गंगेत फेकण्याचा विचार करत आहेत याबद्दल आम्हाला खूप चिंता आहे. या पदकांच्या मागे अनेक वर्षांचे परिश्रम, त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रम आहेत. तो केवळ त्यांचाच नव्हे तर देशाचा अभिमान आहे. आम्ही त्यांना या प्रकरणी घाईघाईने निर्णय न घेण्याची विनंती करतो आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यांचे निराकरण केले जाईल. कायद्याला त्याची वाटचाल करू द्या.
सुनील गावसकर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, के श्रीकांत, सय्यद किरमाणी, यशपाल शर्मा, मदन लाल, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री हे देखील 1983 च्या अंतर्गत विश्वचषक जिंकणाऱ्या संघात होते. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी करत आहेत. याबाबत हे निदर्शनेही सुरू आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!