रोमँटिक झालं जी..! रणजी खेळणाऱ्यानं टीम इंडियाच्या क्रिकेटरला केलं प्रपोज; पाहा PHOTO

WhatsApp Group

Veda Krishnamurthy Engaged : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये टी-२० मालिका खेळत आहे. दरम्यान, महिला संघाची स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्तीनं तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे, वेदाचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून तिनं चाहत्यांना याची माहिती दिली. कर्नाटककडून रणजी क्रिकेट खेळणाऱ्या अर्जुन होयसाला यानं वेद कृष्णमूर्तीला प्रपोज केलं, त्याला उत्तर म्हणून वेदानं होकार दिला. अर्जुनने पर्वतांच्या मध्यभागी जाऊन रोमँटिक अंदाजात वेदाला प्रपोज केलं.

प्रपोजलनंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि एकत्र फोटो क्लिक केले. महिला संघातील इतर खेळाडूंनी वेदा कृष्णमूर्तीचे आयुष्याच्या या नव्या टप्प्यासाठी अभिनंदन केले. दोघांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. २९ वर्षीय वेदा कृष्णमूर्तीनं १८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. ती भारतासाठी ४८ एकदिवसीय सामने खेळली आहे, ज्यामध्ये तिच्या नावावर ८२९ धावा आहेत. तर ७६ टी-२० सामन्यांमध्ये तिनं ८७५ धावा केल्या आहेत. २९ वर्षीय वेद बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे.

हेही वाचा – SL Vs PAK : पराभव बोचला..! PCB अध्यक्षांनी भारतीय पत्रकाराचा फोन हिसकावला; म्हणाले, “तुम्ही तर…”

 

वेदानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७१ धावांसह दहा अर्धशतकं केली आहेत आणि २०२० मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची सरासरी २५.९ आहे जी मधल्या फळीतील फलंदाजासाठी चांगली मानली जाते. तिनं काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत.

कोण आहे अर्जुन?

अर्जुनबद्दल बोलायचं तर तो डावखुरा फलंदाज आहे, ज्यानं २०१६ मध्ये कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याशिवाय, त्यानं कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही आपली जादू दाखवली आहे आणि शिवमोग्गा लायन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. अर्जुन हा एक उत्तम क्रिकेटपटू आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीत अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment