

India vs South Africa : भारतीय क्रिकेट संघ आता टी-२० विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका २८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पुढील महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने टी-२० विश्वचषकासाठी १५ जणांचा संघही जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही.
अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ब्रेक मिळाला आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत दीपक चहरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते. अनुभवी फलंदाज शिखर धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करू शकतो. टी-२० विश्वचषकाच्या दीर्घ दौऱ्यापूर्वी खेळाडूंच्या विश्रांतीबाबत बीसीसीआय सावध आहे. अशा परिस्थितीत धवन वनडे मालिकेचे नेतृत्व करेल. विश्वचषकासाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंसह रोहित शर्मा आणि कंपनीला विश्रांती देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
Touchdown India 🇮🇳#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/17duazX1CP
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 25, 2022
हेही वाचा – IND Vs AUS 3rd T20 : कार्तिकचा हात लागून बेल पडली, तरीही मॅक्सवेल रनआऊट..! वाचा नियम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका
- २८ सप्टेंबर – पहिली टी-२०, त्रिवेंद्रम
- १ ऑक्टोबर – दुसरी टी-२०, गुवाहाटी
- ३ ऑक्टोबर – तिसरी टी-२०, इंदूर
हेही वाचा – मुंबईत एकामागून एक ८ घरं नाल्यात कोसळली..! Video व्हायरल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका
- पहिली वनडे – ६ ऑक्टोबर, रांची
- दुसरी वनडे – ९ ऑक्टोबर, लखनऊ
- तिसरी एकदिवसीय – ११ ऑक्टोबर, दिल्ली
A massive tour 🇿🇦#BePartOfIt pic.twitter.com/znat1emlLx
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 22, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग , मोहम्मद शमी, दीपक चहर.