India vs Pakistan Asia Cup 2023  : भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय 

WhatsApp Group

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कप २०२३ चा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच सामना आहे, तर पाकिस्तान संघ नेपाळविरुद्ध पहिला सामना खेळला आहे.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन (Pakistan Playing 11)

फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.

भारताची प्लेइंग इलेव्हन (India Playing 11)

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

भारत विरुद्ध पाक मॅच टॉस (India vs Pakistan Asia Cup 2023)

भारत विरुद्ध पाक मॅच टॉस अपडेट भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने चार वेगवान गोलंदाज मैदानात उतरवले असून त्यात हार्दिक पांड्याचाही समावेश आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची 90% शक्यता!

पाकिस्तान वि नेपाळ सामना अपडेट 

आशिया चषक २०२३ च्या नव्या मोसमाची पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली. कर्णधार बाबर आझमनेही शतकी खेळी खेळली. स्पर्धेच्या 16व्या मोसमातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय नोंदवला. आशिया चषकातील धावांच्या बाबतीत पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय आहे. बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात प्रथम खेळताना 342 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 104 धावांवर गारद झाला. लेगस्पिनर शादाब खानने 4 बळी घेतले. 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment