Team India : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) फायनलनंतर भारतीय क्रिकेट संघाला मोठा ब्रेक मिळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आल्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीसाठी वेळ मिळणार आहे. बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिका तूर्तास पुढे ढकलण्याचे मान्य केले आहे.
इनसाइडस्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, होय, डब्ल्यूटीसी फायनलनंतर ब्रेक लागेल. आम्ही अजूनही अफगाणिस्तानसोबत मालिका करण्याचा प्रयत्न करत आहोत पण सध्या ती खूप अवघड आहे. ब्रॉडकास्टरशी करार झाला नसून वेस्ट इंडिज दौऱ्याचा विचार करावा लागेल. मला वाटते की ही वेळ खेळाडूंसाठी योग्य आहे ज्यामध्ये प्रत्येकजण विश्रांती घेऊ शकतो.
बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलत होते. यानंतर टी-20 मालिकेबाबतही चर्चा झाली होती, परंतु यावेळी दोन्ही योजना रखडल्या आहेत. याचाच अर्थ सध्या दोन्ही देशांमध्ये एकही मालिका खेळली जात नाही.
India vs Afghanistan ODI series postponed. [ACAUK1]
This means no cricket for India team from June 12th to July 11th. pic.twitter.com/FtqV5ZuvTB
— Johns. (@CricCrazyJohns) June 5, 2023
हेही वाचा – Mumbai : रेल्वेची मुंबईत जय्यत तयारी, पावसाळ्यातही लोकल सुसाट धावणार!
अफगाणिस्तानविरुद्धची मालिका पुढे ढकलण्यामागे ब्रॉडकास्टरचा करार हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआयसोबतचा सध्याचा करार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर संपुष्टात येईल. प्रसारमाध्यमांच्या हक्कांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्यासाठी वेळ लागतो. बीसीसीआयने अफगाणिस्तान मालिकेसाठी तात्पुरत्या मीडिया पार्टनरबद्दल बोलले होते पण ते शक्य झाले नाही.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आता जूनऐवजी सप्टेंबरच्या अखेरीस होणाऱ्या मालिकेसाठी विचार केला जात आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. अफगाणिस्तान संघासाठी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय मालिका खेळणे स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने खूप चांगले असेल.
सप्टेंबरमध्ये मालिका आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. संभाव्य तारीख शोधण्यासाठी आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहोत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेच्या तारखा समोर आल्या की आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल. आम्ही पुढील मालिकेच्या तारखा देखील निश्चित करू शकू.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!