Ishan Kishan got attacked by a bug : भारतानं झिम्बाब्वेविरुद्धचा (IND vs ZIM) वनडे मालिकेतील पहिला सामना १० गडी राखून जिंकला आहे. यासह भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडिया वनडे मालिका जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा कर्णधार लोकेश राहुलवर होत्या. त्यानं आपल्या कर्णधारपदावर छाप पाडली, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, दुखापतीतून परतणाऱ्या दीपक चहरनं शानदार गोलंदाजी करत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
हा सामना भारतासाठी शानदार ठरला, मात्र या सामन्यादरम्यान ईशान किशन चर्चेत आला. राष्ट्रगीतादरम्यान मधमाशीनं त्याला चांगलाच त्रास दिला. या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना एक मधमाशी ईशानच्या चेहऱ्याजवळ आली आणि मग त्याच्या मानेवर बसली. यानंतर ती त्याच्या कानात शिरू लागली, त्यानंतर ईशाननं ती माशी पळवून लावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Ishan Kishan during National Anthem, got annoyed by a Bee.#INDvZIM pic.twitter.com/e1RNct2xj1
— Shubham🇮🇳 (@LoyalCTFan) August 18, 2022
दीपक चहरची शानदार गोलंदाजी!
वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपल्या विकेटकीपिंगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजू सॅमसननं या सामन्यात एक झेल सोडला. यानंतर तो बराच ट्रोल झाला. या सामन्यात भारतीय संघानं २५ अतिरिक्त धावाही दिल्या. मात्र, या सर्व धावा रोखणं कोणत्याही यष्टीरक्षकासाठी सोपं नव्हतं. प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतलेल्या दीपक चहरनं या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्यानं सात षटकांत २७ धावा देत तीन बळी घेतले. सुरुवातीला, चहर त्याच्या लाईन लेन्थमध्ये संघर्ष करताना दिसला, पण नंतर त्यानं चमकदार कामगिरी करत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. दीपक चहरशिवाय प्रसिध कृष्णानंही या सामन्यात शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले.
Sanju Samson the wicketkeeper isn't appreciated enough
#INDvZIM #SanjuSamsonpic.twitter.com/9Yw7UBWbJ3
— Anurag 🇮🇳 (@RightGaps) August 18, 2022
हेही वाचा – VIDEO : “….तेव्हा मी रडत रडत ग्राऊंडच्या बाहेर गेलो”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ घटना!
धवन-गिल नॉटआऊट!
या सामन्यात मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेतल्यानंतर, भारतीय संघानं मधल्या षटकांमध्ये धावा कमी दिल्या आणि विकेट्सही घेतल्या. अक्षर पटेलनं हीतीन बळी घेत झिम्बाब्वेचा संघ १८९ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात शिखर धवननं या सामन्यात शानदार सुरुवात केली आणि पहिल्याच षटकातच दोन चौकार मारून भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर त्यानं सावध फलंदाजी करत नाबाद ८१ धावा केल्या. शुबमन गिलने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८२ धावा केल्या. हे दोघेही शेवटपर्यंत क्रीजवर राहिले आणि भारताला विजय देऊनच परतले.
शिखर धवन आणि शुबमन गिल ही जोडी एकदिवसीय क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत आहे आणि सतत विक्रम करत आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये धवन आणि गिलनं शतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धही अप्रतिम कामगिरी केली होती.