IND vs WI : चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर केल्यानंतर सुनील गावसकर भडकले! म्हणाले….

WhatsApp Group

Sunil Gavaskar : भारताचा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यातून वगळण्याच्या निर्णयामुळे माजी कर्णधार सुनील गावसकर निराश दिसले. गावसकर म्हणतात की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये संपूर्ण भारतीय बॅटिंग युनिटने निराश केले, मग पुजाराला बळीचा बकरा का बनवला जात आहे. अजिंक्य रहाणे वगळता कोणताही भारतीय फलंदाज जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात छाप सोडू शकला नाही. यादरम्यान गावसकरांनी विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, पुजाराचे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स नाहीत, त्याला हटवले तर कोण आवाज करेल?

सुनील गावसकर यांना विचारण्यात आले की, चेतेश्वर पुजारा भविष्यात टीम इंडियात पुनरागमन करू शकेल का? यावर गावसकर म्हणाले, “होय, तो काउंटी क्रिकेट खेळतोय. तो खूप कसोटी क्रिकेट खेळला आहे, त्यामुळे त्याला कसे परत यायचे हे माहीत आहे. 40 किंवा 39 वर्षांपर्यंत लोक खेळू शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही कारण ते सर्व खूप फिट आहेत. जोपर्यंत तुम्ही धावा करत आहात आणि विकेट घेत आहात तोपर्यंत वय हा घटक असावा असे मला वाटत नाही.”

हेही वाचा – फक्त चेतेश्वर पुजाराचीच संघातून हकालपट्टी का? मग विराट, रोहितचं काय?

ते पुढे म्हणाले, ”स्पष्टपणे, फक्त एक व्यक्ती वगळण्यात आली आहे तर इतरही अयशस्वी झाले आहेत. माझ्यासाठी फलंदाजी अपयशी ठरली. अजिंक्य रहाणेशिवाय इतर कोणीही प्रत्यक्षात धावा केल्या नाहीत, मग पुजाराला का वगळण्यात आले. आमच्या फलंदाजीच्या अपयशासाठी त्याला बळीचा बकरा का बनवला जात आहे? तो भारतीय क्रिकेटचा सेवक आहे, तो एक विश्वासू सेवक आहे. कारण त्याचे लाखो फॉलोअर्स नाहीत, त्याला हटवले तर आवाज कोण करणार?”

गावसकर म्हणाले, ”मोठ्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटमधून पूर्ण विश्रांती मिळावी, अशी माझी वैयक्तिक इच्छा होती. त्यांनी फक्त पांढरा चेंडू पाहावा, लाल चेंडू अजिबात पाहू नये अशी माझी इच्छा होती. त्यांना पूर्ण विश्रांती द्यायला हवी होती, कारण ते तीन-चार महिने नॉन-स्टॉप खेळतील.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment