IND vs SL Toss and Playing 11 In Marathi : वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात स्पर्धेचा 33वा सामना रंगत आहे. महत्त्वाचे म्हणजे रोहित शर्माच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मुंबईच्या वानखेडेवर हा सामना रंगत आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने हा सामना जिंकला, तर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला संघ ठरेल. हार्दिक पांड्या या सामन्यातही खेळू शकणार नाही. भारताने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
तब्बल 12 वर्षांनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. 2011 च्या विश्वचषकात शेवटच्या वेळी दोन्ही संघ येथे आमने-सामने आले होते, तेव्हा भारताने श्रीलंकेला हरवून 28 वर्षांनी विजेतेपद पटकावले होते. अशा परिस्थितीत टीम इंडियाला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायला आवडेल.
हेही वाचा – Income Tax Return : आयकर भरणाऱ्यांसाठी सरकारकडून महत्त्वाचे अपडेट!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, कसुन राजिथा, महिष थिक्षणा, दिलशान मधुशंका, दुष्मंथा चमिरा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!