IND vs SL 3rd T20 : सूर्यकुमार यादवची ४५ चेंडूत सेंच्युरी..! बॉलर्सची काढली पिसं; पाहा सेलिब्रेशनचा Video

WhatsApp Group

Suryakumar Yadav Fastest century : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना (IND vs SL 3rd T20) राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक आणि शुबमन गिलच्या महत्त्वपूर्ण फलंदाजीमुळे भारताने श्रीलंकेसमोर २० षटकात ५ बाद २२८ धावा उभारल्या. या सामन्यात भारताकडून सूर्याने ४५ चेंडूत शतक ठोकले.

सूर्यकुमार यादवने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात सूर्य़कुमार यादव नाबाद राहिला. त्याने ५१ चेंडूत नाबाद ११२ धावा चोपल्या. सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकले.

हेही वाचा – Video : गजब बेइज्जती है यार..! भर पत्रकार परिषदेत बाबर आझमचा अपमान; पाहा काय घडलं!

भारतासाठी सर्वात जलद टी-२० शतके (खेळलेले चेंडू)

  • ३५ रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर २०१७
  • ४५ सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, राजकोट २०२३*
  • ४६ केएल राहुल वि विंडीज, लॉडरहिल २०१६
  • ४८ सूर्यकुमार यादव विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम २०२२
  • ४९ सूर्यकुमार यादव वि न्यूझीलंड, माउंट मौंगानुई २०२२

दोन्ही संघांची Playing 11

भारत – इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

श्रीलंका – पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, दासून शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्षणा, कसून रजिता, दिलशान मधुशंका.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment