IND vs SL : सलग ४ चौकार..! शुबमन गिलनं श्रीलंकेच्या बॉलरला धुतलं; पाहा Video

WhatsApp Group

Shubman Gill Four Fours : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने उतरली आहे.  आज तिसऱ्या वनडेत (IND vs SL 3rd ODI) भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग-११ मध्ये संघाने २ बदल केले आहेत. सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक पंड्या आणि उमरान मलिक हा सामना खेळत नाहीत. या सामन्यात संघाचा सलामीवीर शुबमन गिलने चांगली सुरुवात केली. त्याने एका षटकात लागोपाठ ४ चौकार ठोकले.

शुबमन गिलने डावाच्या सहाव्या षटकात शेवटच्या चार चेंडूवर चार चौकार ठोकले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने हे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहितने षटकार ठोकला, त्यानंतर एकेरी धाव काढून शुबमनला स्ट्राइक दिली. त्यानंतर शुबमनने पहिला बॅकवर्ड पॉइंट, दुसरा कवर, तिसरा मिड विकेट आणि चौथा ऑफ ड्राइव्हला चौकार मारला.

हेही वाचा – आजपासून Flipkart वर ‘मोठा’ सेल..! ‘हे’ स्मार्टफोन मिळणार अर्ध्या किंमतीत; वाचा!

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने पुढे आहे. याआधी भारताने टी-२० मालिकाही २-१ अशी जिंकली होती. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीने पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले. याशिवाय रोहित आणि शुबमन गिल यांनीही अर्धशतकी खेळी खेळली. दुसऱ्या वनडेत कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली गोलंदाजी केली. यानंतर केएल राहुलने खराब सुरुवातीनंतर नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

श्रीलंका – एन फर्नांडो, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, एशेल भंडारा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, जेफ्री वांडरसे, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा आणि लाहिरू कुमारा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment