

IND vs SA World Cup 2023 Tickets : विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला 8वा सामना खेळायचा आहे. हा सामना 5 नोव्हेंबरला होणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत. अशा परिस्थितीत सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जवळपास 70 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण आता पोलिसांनी एका व्यक्तीकडून या सामन्याची तिकीटे विकताना 20 तिकिटे जप्त केली आहेत.
अंकित अग्रवाल नावाच्या व्यक्तीला आयसीसी क्रिकेट विश्वचषक भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची तिकिटे विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ही तिकीटे जप्त केली आहेत. अंकित ही तिकीटे प्रत्येकी 2500 रु. ते 11,000 रुपये घेऊन विकत होता.
हेही वाचा – VIDEO : “मी चेअरमन असतो तर ५ खेळाडूंना वर्ल्डकपमधून बाहेर काढलं असतं”, पाकिस्तानी दिग्गज भडकला!
या वर्ल्डकपमध्ये टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघही कमालीचा फॉर्मात आहे. या संघाने 6 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. भारत 6 पैकी 6 विजयासह पहिल्या स्थानी आहे. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत असून दोघांमध्ये रंजक सामना होणार, अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे.
गुणतालिका
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रन रेट |
1. भारत | 6 | 6 | 0 | 12 | +1.405 |
2. दक्षिण आफ्रिका | 6 | 5 | 1 | 10 | +2.032 |
3. न्यूझीलंड | 6 | 4 | 2 | 8 | +1.232 |
4. ऑस्ट्रेलिया | 6 | 4 | 2 | 8 | +0.970 |
5. अफगाणिस्तान | 6 | 3 | 3 | 6 | -0.718 |
6. श्रीलंका | 6 | 2 | 4 | 4 | -0.275 |
7. पाकिस्तान | 6 | 2 | 4 | 4 | -0.387 |
8. नेदरलँड्स | 6 | 2 | 4 | 4 | -1.277 |
9. बांगलादेश | 6 | 1 | 5 | 2 | -1.338 |
10. इंग्लंड | 6 | 1 | 5 | 2 | -1.652 |
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!