

IND vs SA Team Indias ODI squad Announced : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्माऐवजी शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले. तर मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ ऑक्टोबरपासून लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेसोबत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळून विश्वचषकाची तयारी करत आहे.
या मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वास्तविक, हा B संघ असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर दोन दिवसांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशा परिस्थितीत विश्वचषकाच्या मुख्य संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना या संघातून वगळण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक :
- पहिला सामना – गुरुवार ६ ऑक्टोबर, लखनऊ
- दुसरा सामना – रविवार ९ ऑक्टोबर, रांची
- तिसरा सामना – मंगळवार ११ ऑक्टोबर, नवी दिल्ली
Shikhar Dhawan (C), Shreyas Iyer (VC), Ruturaj Gaikwad, Shubhman Gill, Rajat Patidar, Rahul Tripathi, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Ravi Bishnoi, Mukesh Kumar, Avesh Khan, Mohd. Siraj, Deepak Chahar.#TeamIndia | #INDvSA
— BCCI (@BCCI) October 2, 2022
हेही वाचा – Bigg Boss 16 Contestant Sajid Khan : १५व्या वर्षी जेल, दहावीत तीनदा नापास, #MeToo आरोप आणि बरंच काही!
द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा ODI संघ :
शिखर धवन (कप्तान), श्रेयस अय्यर (उपकप्तान), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मो. सिराज, दीपक चहर.