IND vs SA 2nd T20 : मैदानात घुसला साप..! थांबवावी लागली मॅच; पाहा VIDEO

WhatsApp Group

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज गुवाहाटीमध्ये टी-२० मालिकेचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात एक वेगळी घटना पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान मैदानात साप आढळला. या सापामुळे सामना थोडा वेळ थांबवण्यात आला. अनेकदा तांत्रिक बिघाड, फॅन घुसल्याने किंवा कधी कुत्रा आल्याने क्रिकेट सामना थांबला गेला आहे. पण मैदानात साप आल्याने खेळ थांबवावा लागल्याचे प्रथमच ऐकायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल भारताकडून फलंदाजी करत असताना मैदानात साप घुसला.

हा प्रकार पाहून सर्वजण आश्चर्यचकित आणि सावध झाले आणि सापाकडे पाहू लागले. दरम्यान, ग्राउंड स्टाफ धावतच मैदानात आले आणि सापाला पकडून बाहेर काढण्यात आले. सुमारे १० मिनिटे खेळ थांबवण्यात आला, त्यानंतर पुन्हा सामना सुरू करण्यात आला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने एक बदल केला आणि तबरेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.

हेही वाचा – Adipurush Teaser : जय श्रीराम..! मराठी माणसाच्या मिडास टचनं सजलेला ‘आदिपुरुष’ पाहिला का

 

दोन्ही संघांची Playing 11 :

भारत : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, टी. स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, लुंगी एनगिडी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment