T20 World Cup 2022 IND vs SA : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० विश्वचषकात नवा विक्रम केला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रवेश करताना रोहितने स्पर्धेत इतिहास रचला. टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय कर्णधाराने सर्व दिग्गजांना मागे टाकत जागतिक विक्रम नोंदवला आणि अव्वल स्थान पटकावले.
२००७ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या विश्वचषकापासून रोहित शर्मा या स्पर्धेत खेळत आहे. सर्व हंगामात खेळलेल्या रोहितने असा विक्रम केला आहे जो मोडणे सोपे नाही. या सामन्यापूर्वी रोहित श्रीलंकेचा माजी दिग्गज तिलकरत्ने दिलशानसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. या सामन्यात रोहितने टॉ़स जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्धशतकापूर्वी भारताने पाच फलंदाजांना गमावले. रोहित एक चौकार आणि एक षटकारासह १५ धावा काढून बाद झाला.
हेही वाचा – नागपूर ते पुणे, फक्त ८ तासांत..! नितीन गडकरींची ‘मोठी’ घोषणा; वाचा!
🚨 Milestone Unlocked 🔓
3⃣6⃣ & going strong – Most Matches (in Men's Cricket) in #T20WorldCup ! 💪 💪
Congratulations to #TeamIndia captain @ImRo45 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6 #INDvSA pic.twitter.com/OHOuIzJ2Ue
— BCCI (@BCCI) October 30, 2022
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू
- रोहित शर्मा (भारत) – ३६*
- तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – ३५
- ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) – ३४
- शाहिद आफ्रिदी – (पाकिस्तान) ३४
- शाकिब अल हसन (बांगलादेश) ३४*
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कप्तान), रायली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया.