U19 World Cup : फायनलमध्ये पोहोचला भारत! बीडच्या सचिनचं शतक हुकलं

WhatsApp Group

अंडर-19 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत विजेतेपदाच्या सामन्यात धडक मारली आहे. भारताने सेमीफायनलचा हा सामना (U19 World Cup) दोन गडी राखून जिंकला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. भारताने सलग सहावा सामना जिंकला. भारताने नवव्यांदा अंडर-19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. भारत पाच वेळा चॅम्पियन बनला असून तीनदा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. तिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून राज लिंबानीने अष्टपैलू चमक दाखवली. 3 विकेट घेण्यासोबतच त्याने 4 चेंडूत 13 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने आफ्रिकन संघाला केवळ 244 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेकडून दोन अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या. पण जेव्हा फलंदाजी आली तेव्हा आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर आघाडीची फळी गळाला लागली. भारताने आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी आणि मुशीर खानसारखे स्टार फलंदाज अवघ्या 25 धावांत स्वस्तात गमावले.

हेही वाचा – शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांची कशी झाली?

बीडच्या सचिन धसची जबरदस्त खेळी

अंडर-19 युवा संघाचा फलंदाज सचिन धसने टीम इंडियाला अडचणीतून सोडवले. सचिनने 96 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण दुर्दैवाने त्याचे शतक हुकले. या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकाराचाही समावेश होता. याआधी सचिनने नेपाळविरुद्धच्या स्पर्धेत पहिले शतक झळकावले होते. दुसऱ्या टोकाला कर्णधार उदय सहारन पुन्हा एकदा संघासाठी क्रीजवर उभा राहिला. उदयने 124 चेंडूत 81 धावांची खेळी पूर्ण केली. या दोन फलंदाजांमध्ये झालेल्या 175 धावांच्या मॅच-विनिंग भागीदारीमुळे भारताने या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. आफ्रिकन गोलंदाजांनी दोन्ही फलंदाजांचा पराभव केला आणि भारताने सलग पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment