

IND vs SA 1st T20 : ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत धूळ चारल्यानंतर आता टीम इंडिया आज बुधवारी २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. आज पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जात आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर येथेही दवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आजच्या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
मॅच कुठं बघता येईल?
तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना पाहता येईल. हे सामने स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स १ एचडी हिंदीवर पाहण्यासाठी उपलब्ध असतील. यासोबतच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.
India win the toss and will bowl in the first T20I against South Africa 🇮🇳 🇿🇦#INDvSA | Scorecard: https://t.co/hTroM6A741 pic.twitter.com/9Gy9aQ7iuZ
— ICC (@ICC) September 28, 2022
हेही वाचा – ऑस्ट्रेलियानंतर आता भारतासमोर दक्षिण आफ्रिका; वाचा टी-२० आणि वनडे मालिकेचं वेळापत्रक!
GAME DAY 💪🏻💪🏻
All set for the first T20I in Thiruvananthapuram#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/DAb2lks2Ry
— BCCI (@BCCI) September 28, 2022
हेही वाचा – Tata Tiago EV : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च..! किंमत आहे ‘इतकी’
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कप्तान), रायली रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.