IND vs SA : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! कधीपासून? किती सामने? जाणून घ्या!

WhatsApp Group

Team India’s Tour Of South Africa : भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर होणाऱ्या या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने शुक्रवार, 14 जुलै रोजी जाहीर केले. भारत येथे तीन टी-20, एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 7 डिसेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाला वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टीम इंडिया नव्या वर्षाची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. शुक्रवारी बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मिळून भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. दीड महिन्याच्या दौऱ्यात टीम इंडिया एकूण 8 सामने खेळणार आहे.

हेही वाचा – बिग न्यूज! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवारांकडे…

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

टी-20 मालिका

  • पहिली टी-20 – डिसेंबर 10
  • दुसरी टी-20 – डिसेंबर 12
  • तिसरी टी-20 – डिसेंबर 14

वनडे मालिका

  • पहिली वनडे – डिसेंबर 17
  • दुसरी वनडे – डिसेंबर 19
  • तिसरी वनडे – डिसेंबर 21

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी – 26 ते 30 डिसेंबर
  • दुसरी कसोटी – 3 ते 7 जानेवारी

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment