

IND vs SA 3rd T20 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-०ने आघाडीवर आहे. तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होत आहे. या सामन्यातून विराट कोहली, अर्शदीप सिंग आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग-११ मध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज, दीपक चहर, हर्षल पटेल.
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bowl first in the final T20I.
Three changes for #TeamIndia in the Playing XI
Live – https://t.co/dpI1gl5uwA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/gq4Ybx4n6V
— BCCI (@BCCI) October 4, 2022
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कप्तान), क्विंटन डी कॉक, रायली रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरिअर्स, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हेही वाचा – निवडणूक आयोगानं ‘कालीन भैय्या’ला दिली ‘नवी’ जबाबदारी; अभिनेता म्हणाला…