IND vs SA : नाकातून रक्त वाहत असतानाही रोहित लावत होता फिल्डिंग…! हिटमॅनचा Video व्हायरल

WhatsApp Group

Rohit sharma Nose Bleeding : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी-२० मालिका जिंकून एक विशेष कामगिरी केली आहे. मायदेशात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिकेचे नेतृत्व केले होते परंतु त्यांना ती जिंकता आली नाही. तसे, कर्णधार रोहितची चर्चा एका खास कारणासाठी होत आहे. सामन्यादरम्यान अडचणीत असतानाही तो खंबीरपणे उभा राहिला.

रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा सहकारी दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलसोबत दिसत आहे. कॅप्टनच्या नाकातून रक्त वाहू लागल्यानंतरही तो आपले काम कसे करत राहिला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. नाकातून बाहेर पडणारे रक्त रुमालाने साफ करत असताना दिनेश कार्तिकला काहीतरी समजले. कार्तिकने मैदानाबाहेर काही हातवारे केले पण रोहित आपले काम करत राहिला. तो हर्षल पटेल यांच्याकडे गेला आणि त्याला काही समजावले आणि मग तो मैदानाबाहेर गेला.

हेही वाचा – CM एकनाथ शिंदेंची ‘मोठी’ घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं महाराष्ट्रात ७००…

मालिकेत भारताची अजेय आघाडी

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ३ गडी गमावून २३७ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. रोहित ३७ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने सर्वाधिक ६१ धावा केल्या. केएल राहुलने ५७ तर विराट कोहलीने ४९ धावा केल्या. भारताने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला तर दुसरा सामना १६ धावांनी जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment