

IND vs SA : ऑस्ट्रेलियन संघावर मात केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी दोन हात करत आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेला अक्षरश: रडकुंडीला आणले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि दीपक चाहर यांनी जीवघेणी गोलंदाजी करत आफ्रकेला अर्धशतकापूर्वीच सहा धक्के दिले. यात अर्शदीपने क्विंटन डी कॉक (१), रायली रुसो (०), डेव्हिड मिलर (०) यांना माघारी धाडले. यात मिलरची विकेट अतिशय खास होती.
मिलर पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. अर्शदीपने त्याला सुरेख इनस्विंगर टाकत दांड्या गुल केल्या. अप्रतिम वेग, उत्तम स्विंग आणि उत्कृष्ट लाईन-लेंथ या सर्व गोष्टी अर्शदीपच्या या चेंडूत होत्या. अर्शदीप सिंगने तिरुअनंतपुरममध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या टॉप ऑर्डरचा पूर्णपणे पाडाव केला. पाहा अर्शदीपची गोलंदाजी…
हेही वाचा – VIDEO : वकिलानं महिला पोलिसाच्या अंगावर घातली गाडी; नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार!
5 wickets summed up in 11 seconds. Watch it here 👇👇
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/jYeogZoqfD— BCCI (@BCCI) September 28, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कप्तान), रायली रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.