

IND vs PAK Virat Kohli Mistake In Marathi : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ अहमदाबाद येथे ODI विश्वचषकमधील सर्वात मोठा सामना खेळत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराट कोहली एका चुकीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. सामना सुरू झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही विराटला आपली चूक कळली नाही.
काही वेळाने कोणीतरी विराटला आपली चूक सांगितली, त्यानंतर विराटने ती चूक साधारली. विराट फिल्डींग करताना वेगळी जर्सी घालून आला होता. या जर्सीच्या खांद्यावर तिरंगा नव्हता. त्यानंतर मैदानावरील कोणीतरी त्याच्याकडे लक्ष वेधताच, ओव्हर संपताच विराटने आपली जर्सी बदलली.
हेही वाचा – IND Vs PAK : इशान किशनला बाहेर बसवल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
टीम इंडियाचा जर्सी प्रायोजक आदिदासने भारतीय संघासाठी दोन वेगवेगळ्या शैलीतील जर्सी बनवल्या आहेत. एका जर्सीत, जर्सीच्या दोन्ही खांद्यावर लावलेल्या तीन पट्ट्या हे भारतीय ध्वजाचे तीन रंग आहेत, जे या विश्वचषकात टीम इंडिया वापरत आहे, तर दुसर्या जर्सीत, दोन्ही खांद्यावर तीन पांढरे पट्टे आहेत. जे Adidas लोगोपासून प्रेरित दिसते.
इथे फक्त विराटनेच चूक केली. या सामन्यासाठी त्याने तीन पांढरे पट्टे असलेली ही जर्सी घातली होती. सुरुवातीला कोणीही याकडे लक्ष दिले नाही आणि राष्ट्रगीत सुरू असतानाही तो या जर्सीत उभा राहिला. पण सामना सुरू झाल्यानंतर सहकारी खेळाडूने या पट्ट्यांकडे लक्ष वेधताच विराटनेही त्याकडे आश्चर्याने पाहिले आणि नंतर ओव्हर संपल्यानंतर त्याने ही जर्सी बदलली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!