IND vs PAK : भारतीय गोलंदाजांचा जलवा, पाकिस्तान उद्ध्वस्त! 192 रन्सचं टार्गेट

WhatsApp Group

IND vs PAK World Cup 2023 Pakistan Inning In Marathi : वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान लढत अहमदाबादमध्ये रंगत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी अचूक ठरवला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव 191 धावांवर संपुष्टात आला.

पाकिस्तान ऑलआऊट! (IND vs PAK)

पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने शफीकला (20) बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पांड्याने इमामला (36) तंबूत पाठवले. कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला. 25 षटकांनंतर पाकिस्तानच्या 2 बाद 125 धावा होत्या. त्यानंतर बाबरने अर्धशतक पूर्ण केले. सिराजने बाबरची दांडी दूल केली. त्यानंतर बुमराहने रिझवानला अर्धशतकापासून वंचित ठेवले. रिझवानने 7 चौकारांसह 49 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकात 191 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.

हेही वाचा – World Cup 2023 : न्यूझीलंड संघावर कोसळला दुःखाचा डोंगर!

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs PAK Update)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment