IND vs PAK : बाबर आझम आऊट होताच अरिजित सिंगचा धुमाकूळ घालणारा डान्स!

WhatsApp Group

Arijit Singh Celebrates Babar Azam Wicket : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वर्ल्डकप 2023 च्या सामन्यात भारताविरुद्ध पहिले एकदिवसीय अर्धशतक झळकावले. मात्र, पन्नास धावा केल्यानंतर बाबर फार काळ टिकू शकला नाही आणि तो सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बाबरने मोहम्मद रिझवानसोबत किल्ला लढवला. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. टॉस हरलेला पाकिस्तान संघ 191 धावांवर ऑलआऊट झाला.

बाबर आझम (Babar Azam News In Marathi) बाद झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित हजारो भारतीय चाहते नाचू लागले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेला प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही (Arijit Singh Dance) बाबर आझम बाद झाल्यानंतर नाचताना दिसला. पाकिस्तानी डावातील 30व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला क्लीन बोल्ड करून भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेला गायक अरिजित सिंग यानेही बाबर बाद झाल्याचा आनंद साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND Vs PAK : भारतीय गोलंदाजांचा जलवा, पाकिस्तान उद्ध्वस्त! 192 रन्सचं टार्गेट

भारत-पाक सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात अरिजित सिंग यांच्यासह अनेक प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांनी शानदार परफॉर्मन्स दिला.

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs PAK Update)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment