IND vs PAK T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिराने सुरू झाला. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. थोडासा ओलावा असलेल्या खेळपट्टीचा फायदा घेत पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताला नियंत्रणात ठेवले. हारिस रौफ, मोहम्मद आमिर, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह या जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दोन जीवदाने लाभलेल्या ऋषभ पंतने संघासाठी सर्वाधिक 42 धावा केल्या.
भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (13) आणि विराट कोहली (4) बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंतने 6 चौकारांसह झुंज दिली. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 20 धावा केल्या. सूर्यकुमार यादव (7), शिवम दुबे (3), हार्दिक पांड्या (7), रवींद्र जडेजा (0) या फलंदाजांनी सपशेल गुडघे टेकले. पाकिस्तानकडून हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. आमिरने 2 विकेट्स काढल्या. भारताचा संपूर्ण संघ 19 षटकात 119 धावांवर ऑलआऊट झाला.
Terrific job by the bowlers as India are all out for 1️⃣1️⃣9️⃣ ✨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 9, 2024
Over to the batters after the break 🏏#INDvPAK | #T20WorldCup | #WeHaveWeWill pic.twitter.com/89xbY8pMen
हेही वाचा – “तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलंय…”, खासदाराला कसं कळतं? आमंत्रण पत्रात काय असतं? जाणून घ्या
यापूर्वी या विश्वचषकात पाकिस्तानला अमेरिकेसारख्या नव्या संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरीकडे भारताने पहिला सामना जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा