Rohit Sharma On Ishan Kishan : वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान महामुकाबला (World Cup 2023 IND vs PAK) रंगत आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीवीर आणि डेंग्यूने आजारी पडलेल्या शुबमन गिलवर सर्वांच्या नजरा होत्या. तो या सामन्यात खेळतो का, याबद्दल सर्व अनभिज्ञ होते. पण तो पूर्णपणे फिट असून भारताच्या अंतिम-11 संघाचा भाग आहे. शुबमन आत आल्यामुळे इशान किशनला संघाबाहेर व्हावे लागले.
रोहित शर्मा टॉसदरम्यान (IND vs PAK) म्हणाला, ”आम्ही प्रथम गोलंदाजी करू, यापेक्षा मोठा क्षण असू शकत नाही, हे विलक्षण वातावरण आहे. आपल्यापैकी बरेच जण खरोखरच असाधारण काहीतरी अनुभवणार आहेत. हा एक चांगला ट्रॅक आहे, फारसा बदल होणार नाही, दव हा एक मोठा घटक असू शकतो आणि हे लक्षात घेऊन आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. आम्हाला सर्वोत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहायचे आहे, आम्हाला प्रत्येक सामन्यात आमचे सर्वोत्तम द्यायचे आहे. अशा स्पर्धेमध्ये संघातील वातावरण शांत ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इशान किशनच्या (Ishan Kishan News In Marathi) जागी शुबमन गिल संघात परतला आहे, इशानचे नसणे दुर्दैवी आहे, त्याच्याबद्दल वाईट वाटतंय, जेव्हा आम्हाला त्याची गरज होती तेव्हा त्याने काम केले. गेल्या वर्षभरात गिल आमच्यासाठी खास खेळाडू आहे, विशेषत: या मैदानावर आणि आम्हाला तो परत हवा होता.”
दोन्ही संघांची Playing 11 (IND vs PAK Update)
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!