भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर बाबर आझमच्या पप्पांनी घेतला ‘असा’ निर्णय!

WhatsApp Group

IND vs PAK : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या अडचणीत सापडला आहे. विश्वचषक 2023 च्या सामन्यात पाकिस्तानला टीम इंडिया विरुद्ध 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. यानंतर चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत कर्णधार बाबर आझम आणि संपूर्ण संघावर टीका करत आहेत. दरम्यान, बाबरचे वडील आझम सिद्दीकी (Azam Siddique) यांनी त्याचे सोशल मीडिया अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले आहे. भारताविरुद्धच्या सामन्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करतान केवळ 191 धावा केल्या. बाबर आझमने 50 आणि मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. त्यांनी शेवटच्या 8 विकेट 36 धावांत गमावल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित शर्माने 6 षटकारांच्या जोरावर 86 धावा केल्या.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंशिवाय त्यांच्या कुटुंबियांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशा परिस्थितीत बाबर आझमचे (Babar Azam’s Father News) वडील आझम सिद्दीकी यांनी त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट निष्क्रिय केले आहे. तर बाबर आझमने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीचे कमेंट सेक्शन ब्लॉक केले आहे. ट्रोल्समुळे तोही हैराण झाला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबरने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, टी-20 वर्ल्डकपमध्ये आम्ही टीम इंडियाचा पराभव केला आहे. अशा स्थितीत एकदिवसीय विश्वचषकातही त्यांचा पराभव होऊ शकतो, पण तसे होऊ शकले नाही.

हेही वाचा – गावच्या जत्रेत गेलेल्या मुलाचा मृत्यू, पाळण्याची दोरी गळ्यात अडकली आणि…

आता ऑस्ट्रेलियाशी सामना

पाकिस्तान संघाने वर्ल्डकप 2023 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले असून 2 सामने जिंकले आहेत. बाबर आझमच्या (Babar Azam News In Marathi) नेतृत्वाखाली संघाने नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्ध विजयांची नोंद केली. 20 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा सामना 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. तसेच भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना बंगळुरू येथे होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment