IND vs PAK Asia Cup 2022 : “आम्हाला माहीत होतं…”, पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहित काय म्हणाला? वाचा!

WhatsApp Group

Asia Cup 2022 : दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ५ विकेट्सनं पराभव केला. टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं शेवटच्या षटकात अवघ्या ५ विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. हार्दिक पंड्यानं षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

भारताच्या या विजयाचा हिरो ठरला स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या. हार्दिकनं प्रथम गोलंदाजीत तीन बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजीत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं नाबाद ३३ धावा केल्या. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं की, आम्हाला या सामन्यातील विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याचवेळी रोहितनं हार्दिकचे कौतुक करत तो भारतीय संघात परतल्यानंतर चांगली कामगिरी करत असल्याचे सांगितलं.

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : विराट कोहलीनं ठोकलं शतक; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!

विजयानंतर रोहितनं हार्दिकचं केलं कौतुक

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, ”लक्ष्याच्या निम्म्यापर्यंत आम्हाला माहीत होतं, की आम्ही कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकू शकतो. जेव्हापासून त्यानं (हार्दिक) पुनरागमन केले तेव्हापासून तो शानदार खेळत आहे. जेव्हा तो संघाचा भाग नव्हता तेव्हा त्यानं आपल्या शरीराचे आणि त्याच्या फिटनेसचं काय करावं लागेल याचा विचार केला. आता तो १४० पेक्षा अधिक वेगानं गोलंदाजी करत आहे. दुसरीकडं, हार्दिकच्या फलंदाजीबाबत रोहित म्हणाला, आपल्या सर्वांना माहीत आहे की तो बॅटनं काय करू शकतो. कमबॅक केल्यापासून, तो खूप शांत आणि आत्मविश्वासू झाला आहे. तो वेगवान गोलंदाजी करू शकतो. फक्त त्याचा खेळ समजून घेण्याची बाब आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे.”

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : ज्या मैदानावर झुकली मान, तिथंच घेतला बदला..! भारताची पाकिस्तानवर मात

पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर आटोपला

दुबईत खेळल्या जात असलेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला १४८ धावांचं लक्ष्य दिलं. पाकिस्तानचा संघ १९.५ षटकात १४७ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं ४३ धावा केल्या. मात्र, तो अतिशय संथपणे खेळला. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी भारतासाठी अप्रतिम गोलंदाजी केली. हार्दिकनं चार षटकांत केवळ २५ धावा देत तीन बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमारला एकूण चार बळी घेता आले.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान – बाबर आझम (कप्तान), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, फखर अहमद, खुशदल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रौफ, शाहनाझ दहानी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment