World Cup 2023 Semi Final Schedule In Marathi : रोहित शर्माच्या टीम इंडियाने वर्ल्डकप 2023च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेतील टॉप-4 संघ निश्चित झाले आले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सेमीफायनलमध्ये पोहोचलेले बलाढ्य संघ आहेत.
पाकिस्तानचा संघही सेमीफायनलच्या शर्यतीत होता, परंतु शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळताच ते स्पर्धेबाहेर गेले. बाबर आझमचा पाकिस्तान आता थेट मायदेशी परतणार आहे.
या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांना न्यूझीलंडकडून (IND vs NZ) स्पर्धेला सामोरे जावे लागेल. हा तोच संघ आहे, ज्याने वर्ल्डकप 2019 च्या उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेतील दोन्ही संघांमध्ये जुने वैर आहे.
हेही वाचा – Best Smartphones Under Rs 15000 : 15 हजारात मिळणारे बेस्ट 6 स्मार्टफोन्स!
रोहितकडे मागील सेमीफायनलचा बदला घेण्याची मोठी संधी असेल. यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हे देखील रोहितचे होम ग्राऊंड आहे. याच वर्ल्डकपमध्ये भारताने श्रीलंकेला 55 धावांत गुंडाळून 302 धावांनी सामना जिंकला होता.
यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 5 वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकाने अनेक वेळा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण येथे ती चौरस चोकर्स ठरली.
मात्र यावेळी टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने खेळत आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा सेमीफायनल सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.
पहिली सेमीफायनल
भारत विरुद्ध न्यूझीलंड – मुंबई (वानखेडे स्टेडियम) – 15 नोव्हेंबर
दुसरी सेमीफायनल
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – कोलकाता (ईडन गार्डन) – 16 नोव्हेंबर
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!