

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यातही नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजुने लागलेला नाही. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे न्यूझीलंडलाठी फायनल खेळू शकणार नाही.
भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. भारतीय संघ अंतिम फेरीत प्रबळ दावेदार मानला जात आहे, परंतु आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. रोहित शर्माने सलग १५ वेळा टॉस गमावला आहे.
India's Last 15 Tosses in ODI
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) March 9, 2025
L L L L L L L L L L L L L L L*#ChampionsTrophy2025 pic.twitter.com/sm8FAsZkz2
२००० चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल या सर्व मोठ्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. अशा परिस्थितीत ते पुन्हा एकदा मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंड – विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कप्तान), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!