Video : सरफराज खानचे तडाखेबंद शतक! संघाला गरज असताना खेळला, आता सामना पालटणार?

WhatsApp Group

Sarfaraz Khan : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी युवा फलंदाज सरफराज खानने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. सरफराजच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे आणि ते अशा वेळी आले जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती.

सरफराजने चौथ्या दिवशी 70 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि आक्रमक शैलीत फलंदाजी केली. सरफराजच्या शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 344 धावा केल्या असून भारत 12 धावांनी पिछाडीवर आहे. शतक झळकावताच सरफराजने आनंदाने उडी मारली आणि खेळी साजरी केली. एवढेच नाही तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.

सरफराजने न्यूझीलंडच्या सर्व गोलंदाजांचा सामना केला आणि झटपट धावा केल्या. कोणताही गोलंदाज त्याच्यावर दबाव टाकू शकला नाही. त्याने नाबाद 125 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, सरफराजने विराट कोहलीच्या साथीने 163 चेंडूत 136 धावा जोडल्या. कोहली 70 धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Meta Layoffs : इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमध्ये नोकर कपात! जाणून घ्या कारण

सरफराजने या वर्षी इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. त्याने 4 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या 7 डावात सुमारे 56 च्या सरासरीने 300 हून अधिक धावा केल्या आहेत. 1 शतकाव्यतिरिक्त त्याने आपल्या बॅटने 4 अर्धशतकेही केली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत सरफराजने 3 सामन्यांच्या 5 डावात 50 च्या सरासरीने 200 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 68* धावा होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment