IND vs NZ 1ST T20 : HotStar वर नाही, तर ‘इथं’ पाहा मॅच..! ‘अशी’ असणार Playing 11?

WhatsApp Group

IND vs NZ 1ST T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ नोव्हेंबरपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. तीन टी-२० सामन्यांव्यतिरिक्त भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तेवढेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी सारखे वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यावर गेलेले नाहीत. भारतीय टी-२० संघाची कमान हार्दिक पंड्याकडे आहे. त्याचबरोबर अनुभवी खेळाडू शिखर धवनकडे वनडे संघाचे नेतृत्व असेल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेला नाहीत. व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-२० सामना : १८ नोव्हेंबर, वेलिंग्टन
  • दुसरा टी-२० सामना : २० नोव्हेंबर, माउंट मौनगानुई
  • तिसरा टी-२० सामना : २२ नोव्हेंबर, नेपियर

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली वनडे : २५ नोव्हेंबर, ऑकलंड
  • दुसरी वनडे : २७ नोव्हेंबर, हॅमिल्टन
  • तिसरी वनडे : ३० नोव्हेंबर, ख्राइस्टचर्च

हेही वाचा  – बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार!

 

पहिल्या टी-२० साठी भारताची संभाव्य प्लेइंग ११ :

इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

भारतीय एकदिवसीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंटन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग यादव, अर्शदीप सिंह. दीपक चहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.

कुठे पाहता येणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर DD Sports वर पाहता येईल. सामन्यांच्या मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही प्राइम व्हिडिओवरही पाहू शकता.

Leave a comment