IND vs NZ : शुबमन गिलची वनडेत डबल सेंच्युरी..! षटकार ठोकून केलं अँग्री सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल!

WhatsApp Group

Shubman Gill Double Century : हैदराबादमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ 1st ODI) शुबमन गिलने द्विशतक ठोकत सर्वांना थक्क केले. शुबमनने या सामन्यात १४९ चेंडूत १९ चौकार आणि ९ षटकार ठोकत २०८ धावा फटकावल्या. लॉकी फर्ग्युसनने टाकलेल्या ४९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शुबमनने षटकार ठोकत आपले द्विशतक पूर्ण केले. या योगदानामुळे भारताने ५० षटकात ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला.

हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारासह शुबमन गिलने संघाला आणखी एक चांगली सुरुवात करून दिली.

हेही वाचा – Maruti Suzuki Recalls : अरे बापरे..! मारुती सुझुकीच्या ‘या’ १७ हजार गाड्यांमध्ये प्रॉब्लेम; तुमच्याकडे आहे का?

तेंडुलकर आणि रोहित राहिले मागे

शुबमन गिलने अवघ्या १९व्या वनडे डावात द्विशतक झळकावले. भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनीही द्विशतके झळकावली आहेत.

वनडेमध्ये २०० धावा करणारे सर्वात तरुण खेळाडू

  • २३ वर्ष १३२ दिवस – शुबमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद २०२३
  • २४ वर्ष १४५ दिवस – इशान किशन विरुद्ध बांगलादेश, चट्टोग्राम २०२२
  • २६ वर्ष १८६ दिवस – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू २०१३

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment