Shubman Gill Century : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ 1st ODI) शुबमन गिलने त्याच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. याआधीच्या सामन्यात गिलने श्रीलंकेविरुद्ध ११६ धावांची खेळी केली होती. आपल्या शतकी खेळीदरम्यान गिलने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. गिल हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. असे करून गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. गिलने १९व्या सामन्यात हा पराक्रम केला, तर कोहलीने कारकिर्दीतील २४व्या वनडेत १००० धावा पूर्ण केल्या. वनडेमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमानच्या नावावर आहे.
फखरने १८ वनडेत १००० धावा पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर इमाम-उल-हक आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत १९ एकदिवसीय सामन्यांमध्ये हा पराक्रम केला. गिलने १९व्या वनडेत करिअरच्या १००० धावा पूर्ण करत इमामची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर गिलने व्हिव्हियन रिचर्ड्स, केविन पीटरसन यांसारख्या दिग्गजांना पराभूत केले आहे. शुबमनने आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक ८७ चेंडूत ठोकले.
Back-to-back ODI tons for Shubman Gill 👏#INDvNZ | 📝: https://t.co/raJtMjMaEn pic.twitter.com/yXkSO6lYX6
— ICC (@ICC) January 18, 2023
Here to rule, Shubman Gill. pic.twitter.com/xugAPVhVFv
— Johns. (@CricCrazyJohns) January 18, 2023
Well played #ShubmanGill Congratulation🥈🇮🇳 for your excellent 💯, we waiting for your 200 today
#INDvsNZ1000 ODI pic.twitter.com/BDzrUidVsr
— PRAGATI SAHU (@sahupragati111) January 18, 2023
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या संघात भारताने तीन बदल केले. हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर आणि ईशान किशन यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!