IND vs IRE : हार्दिक पांड्या, शुबमन गिल टीम इंडियाच्या बाहेर!

WhatsApp Group

Team India Tour Of Ireland : भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांना या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. यानंतर आशिया कप 2023 आणि विश्वचषक 2023 होणार आहेत. आयसीसीच्या या दोन मोठ्या स्पर्धा पाहता टीम इंडिया पांड्या आणि गिल यांना विश्रांती देऊ शकते.

पांड्या हा भारताच्या एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाचा समतोल राखण्यात मोठी भूमिका असते. पीटीआयच्या मते, बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले, “अद्याप काहीही ठरवलेले नाही आणि एकदिवसीय आणि टी-20 नंतर हार्दिकला कसे वाटते यावर देखील ते अवलंबून असेल.”

हेही वाचा – Horoscope Today : सिंह आणि धनु राशीचे लोक शशी मंगल योगाने धनवान, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यानंतर तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 जुलैपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 3 ऑगस्टपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी डब्लिन येथे होणार आहे. यानंतर 20 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट रोजी सामने होणार आहेत.

विशेष म्हणजे शुबमनचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्याने 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1311 धावा केल्या आहेत. शुबमनने वनडे फॉरमॅटमध्ये 4 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 208 धावा आहे. त्याने 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 202 धावा केल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने 74 वनडेमध्ये 1584 धावा केल्या आहेत. यासह त्याने 72 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1271 धावा केल्या आहेत आणि 69 विकेट्स घेतल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment