IND vs ENG : यशस्वी जयस्वालला सुवर्णसंधी, सुनील गावसकरांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणार?

WhatsApp Group

IND vs ENG | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरू होत आहे. टीम इंडियाचा स्टार युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. या युवा फलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी दोन सामन्यात द्विशतके झळकावली आहेत. सध्या तो या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. त्याने आतापर्यंत चार सामन्यांत 655 धावा केल्या आहेत. महान सुनील गावसकर यांच्यासह इतर अनेक बड्या क्रिकेटपटूंचे विक्रम मोडण्याची संधी त्याला आहे. सर्व प्रथम, 700 धावांचा टप्पा पार करणारा तो दुसरा भारतीय ठरू शकतो. अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज म्हणजे सुनील गावसकर. हा पराक्रम गावसकरांनी दोनदा केला आहे. सुनील गावसकर यांनी हा विक्रम दोन्ही वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध केला आहे.

1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गावसकर यांनी ऐतिहासिक 774 धावा केल्या होत्या. त्या मालिकेत गावसकर यांनी 65, 67, 116, 64, 117*, 124 आणि 220 धावा खेळल्या. एका डावात केवळ एका धावेवर ते बाद झाले. हा विक्रम मोडण्यासाठी जयस्वालला आणखी 120 धावांची गरज आहे.

हेही वाचा – पाकिस्तानी बॉक्सरचे लज्जास्पद कृत्य, महिलेच्या पर्समधून पैसे चोरले आणि पळ काढला!

जयस्वालने रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत 73 धावा केल्या आणि कसोटी मालिकेत 600 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. या युवा खेळाडूने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील चार सामन्यांत 93.57 च्या सरासरीने 655 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन बॅक टू बॅक द्विशतकांचा समावेश आहे. जयस्वालच्या या शानदार खेळीसाठी, न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि श्रीलंकेच्या पाथुम निसांका यांच्यासह फेब्रुवारी 2024 च्या आयसीसी पुरूष खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment