अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत असलेल्या टीम इंडियाच्या नजरा या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहेत. शुक्रवारी या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आणि पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंनी भरलेली टीम इंडिया पाहायला मिळाली. या संघात तीन यष्टीरक्षक ठेवण्यात आले आहेत, मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चर्चेत असलेला इशान किशन (IND vs ENG Ishan Kishan) या संघात नाही.
अशा परिस्थितीत इशान किशनला शिक्षा का दिली जात आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून इशान किशनबद्दल सतत चर्चा सुरू असून टीम इंडियामध्ये त्याला कोणत्या वादांना तोंड द्यावे लागले हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. इशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला असून अफगाणिस्तान मालिकेत त्याची निवड होणार नसल्याची चर्चा असतानाच त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.
यापूर्वी असे मानले जात होते, की या मालिकेत केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळेल, तर इशान किशनला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकते. पण संघाने तीन यष्टीरक्षक निवडले, ज्यात केएस भरत, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. इशान किशनला इथे स्थान का मिळालं नाही, टीम इंडियाचा इशान किशनवर राग आहे का, हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा – कामाची बातमी! मुंबईत 20 जानेवारीला रोजगार मेळावा
इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौरा मध्यंतरी सोडला होता. मानसिक दबावाचा सामना करत असल्याने काही वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवायचा आहे, या कारणास्तव त्याने बीसीसीआयकडे रजा मागितली होती. त्याला बीसीसीआयकडून सुट्टी मिळाली, पण काही दिवसांनी तो त्याच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसला. कदाचित हेच टीम इंडिया आणि बीसीसीआयला आवडले नसेल, याशिवाय तो या ब्रेकदरम्यान एका टीव्ही शोमध्येही गेला होता.
यानंतर त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत निवड झाली नाही आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही इशान किशनला सल्ला दिला की, त्याने आता जाऊन रणजी ट्रॉफी खेळावी, जेणेकरून तो टीम इंडियाच्या कसोटी संघासाठी स्वत:ला उपलब्ध करून देऊ शकेल. पण इशान आपल्या ब्रेकवर राहिला.
राहुल द्रविडने सांगितले, की इशान किशनवर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. परंतु संघ निवडीवरून असे दिसून आले की टीम इंडिया इशानला परत बोलावण्याच्या मनस्थितीत नाही. आणि कदाचित जोपर्यंत इशान पूर्ण प्रयत्न करत नाही तोपर्यंत काही खरे दिसत नाही.
पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरैल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका
25-29 जानेवारी : पहिली कसोटी, हैदराबाद
2-6 फेब्रुवारी : दुसरी कसोटी, विशाखापट्टणम
15-19 फेब्रुवारी : तिसरी कसोटी, राजकोट
23-27 फेब्रुवारी : चौथी कसोटी, रांची
7-11 मार्च : पाचवी कसोटी, धर्मशाला
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!