भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून भारताला मोठ्या धावसंख्येचा मार्ग दाखवला आहे. विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test) यशस्वीने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. यशस्वीच्या छोट्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे आणि घरच्या मैदानावरील पहिले शतक आहे. या शतकासह यशस्वी ‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी, घरच्या आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन आणि यशस्वीशिवाय रवी शास्त्रींच्या नावाचाही समावेश आहे.
यासह यशस्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वीने यापूर्वी 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 502 धावा केल्या होत्या. या सामन्यापूर्वी त्याने 5 कसोटी सामन्यांमध्ये 411 धावा केल्या होत्या, ज्याची संख्या आता 511 पेक्षा जास्त झाली आहे. त्याचे हे दुसरे कसोटी शतक आहे. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची कसोटी सरासरी 45 च्या आसपास आहे आणि या फॉरमॅटमध्ये तो 60 च्या स्ट्राईक रेटने धावा करतो. मात्र, यशस्वीला अद्याप वनडेत खेळण्याची संधी मिळालेली नाही.
हेही वाचा – Poonam Pandey Death : सर्व्हिकल कॅन्सर काय असतो? कशामुळे होतो? उपाय काय?
यशस्वी जयस्वालसाठी आजचा सामना सोपा नव्हता. कर्णधार रोहित शर्मा (14) लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुबमन गिललाही (34) मोठी खेळी करता आली नाही. दोन गडी लवकर बाद झाल्याने जयस्वालवर दडपण येणे अपरिहार्य होते. दुसऱ्या टोकाला श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. त्यानंतर पदार्पणवीर रजत पाटीदारने 32 धावांची सुंदर खेळी केली. पहिल्या दिवसअखेर भारताने 93 षटकात 6 बाद 336 धावा केल्या आहेत. यशस्वी 17 चौकार आणि 5 षटकारांसह 179 तर रवीचंद्रन अश्विन 5 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!