VIDEO : ताशी 142 किमी वेगाने टॉकला बॉल, इंग्लिश फलंदाजाच्या दांड्या गुल, पाहा जसप्रीत बुमराहची ‘अँग्री’ रिअॅक्शन!

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या दोन दिवसात दोन्ही संघांनी आपापल्या फिरकीपटूंवर अधिक विश्वास दाखवला आणि यशही मिळाले. पण खेळाच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा जसप्रीत बुमराहने दाखवून दिले की या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचीही मदत आहे.

तिसऱ्या दिवशी भारत 436 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला. तो बॅझबॉल शैलीत फलंदाजी करत होता. सतत वेगाने धावा करत होता. सलामीवीर बेन डकेटने भारतीय संघाला अडचणीत आणले होते. मात्र, बुमराहने त्याला आधीच जाळ्यात अडकवले होते. चेंडू त्याच्या पॅडला लागला. टीम इंडियाने अपील केले. पण अंपायरने आऊट दिला नाही. यानंतर भारताने डीआरएसही घेतला नाही. मोठ्या स्क्रीनवर पाहिले तर बॉल स्टंपवर लागत होता. हे पाहून जसप्रीत थोडा निराश झाला. डीआरएस न घेतल्याने राग आल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून आले. दुसरीकडे, डकेटला जीवदान मिळाले.

हेही वाचा – लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट जवळपास प्रत्येक षटकात चौकार मारत होता. जसप्रीत बुमराह भारतासाठी इंग्लंडच्या डावातील 19 वे षटक टाकत होता. त्या ओव्हरच्या पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर डकेटने चौकार मारले. डीआरएस न घेतल्याने बुमराह आधीच थोडा निराश झाला होता. तर बेनच्या दोन चौकारांनी त्याला आणखी राग दिला. बुमराह ओव्हरचा पाचवा चेंडू विकेटच्या आसपास टाकत होता.

बुमराहने एक लेन्थ बॉल 142 च्या वेगाने चेंडू टाकला. या बॉलने थोडा कोन बदलला आणि बेन डकेट बोल्ड झाला. विकेट घेतल्यानंतर बुमराह चांगलाच आक्रमक झाला. त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. बेन डकेटच्या विकेटनंतर कर्णधार रोहित शर्माही खूश झाला. डकेट 52 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment